‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ : ‘आपण कवितेत कोणतीही तडजोड न करता भूमिका मांडतो’, असे स्पष्टपणे सांगणाऱ्या कवीचा नवा संग्रह
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या चतुसूत्रीवर भिस्त ठेवून विज्ञाननिष्ठा आणि मानवी जीवनाचा तळ शोधणारे मराठीत जे काही मोजके कवी आहेत, त्यात यशवंत मनोहर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. काही लोकांना कायमस्वरूपी गुलाम ठेवण्याची व्यवस्थेची व्यूहरचना, त्यातून शोषित-पीडितांचा संघर्ष, मानवी मूल्याचा शोध इत्यादी बाबतीत यशवंत मनोहरांची लेखणी सातत्याने स्फुल्लिंग चेतवत असते.......